औरंगाबाद : मंत्री संदीपान भुरे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे , अशी तक्रार युवराज शिवाजीराव चावरे या तरुणाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे . मात्र , यावर अजून गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते . याप्रकरणी  संदीपान भुरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला . मात्र , तो उपलब्ध झाले नाहीत . चावरे हे पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी असून , ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत . आमच्याविरोधात का राजकारण करतोस म्हणून भुमरे यांनी धमकी दिली आहे . याप्रकरणी योग्य न्याय नाही मिळाल्यास आपण आत्मदहन करू , असा इशाराही त्यांनी दिला आहे . धमकीचा कॉल केला युवराज चावरे यांनी याबद्दल प्रसारमाध्यमांशीही बोलले . ते म्हणाले की , मला सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा व्हॉटसअप ऑडिओ कॉल आला होता . त्यांनी त्यामध्ये मला धमकी दिली . काल आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या जंगी सत्काराचे पाचोड येथे आयोजन केले होते मनात धरून त्यांनी हा कॉल केला . अश्लील भाषेत शिवीगाळ चावरे म्हणाले की , भुमरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली . धमकावले देखील . त्यांनी मला विचारले की , तू आमच्याविरोधात का राजकारण करतोस . आमच्याविरोधात का अशा पोस्टी सोडतोस . मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो . मात्र , ते कुठल्याही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते . त्यांनी मला सरळ अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली . त्यानंतर त्यांनी तू कसे राजकारण करतो , कसा पाचोडला येतो , तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवतो , अशी धमकी मला दिली . तुला बघून घेईल म्हणाले