रांजणगाव गणपती: आसानसोल (पश्चिम बंगाल) येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या जी व्ही माळवनकर शूटिंग चॅम्पमियनशिप स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्रावणी संतोष वाळके हिने दहा मीटर पिपसाईड एअर रायफल या प्रकारात 400 पैकी 372 गुणांची कमाई केली असुन या कामगिरीमुळे तिची 1 ते 9 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे होणाऱ्या 65 व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रावणीचे वडील हे शेतकरी असुन श्रावणी हि कारेगाव येथील कारेश्वर इंग्लिश स्कूल येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत आहे. शिरुर मधील युनिक शूटिंग स्पोर्ट् क्लब मध्ये ती शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या यशाबद्दल श्रावणीवर कौतुकाचा वर्षाव होत असुन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाभुळसर खुर्द च्या गावच्या सरपंच सोनाली फंड, उपसरपंच शेखर डाळिंबकर तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले असुन आगामी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.