खेड : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत, पंचायत समिती शिक्षण विभाग खेड येथील बहुउद्देशीय संसाधन व संशोधन केंद्र खेड मधील दिव्यांग विद्यार्थी यांनी दिपावली निमित्त तयार केलेल्या आकर्षक व स्वस्त दरातील वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे ,या मेळाव्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःह बनविलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींन करीता. क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक कार्य करणाऱ्या दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष.आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.प्रशांत सावंत,संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग नाचरे,मंगेश चांदणे,हर्षद चव्हाण,राजेश धारीया,संदीप आखाडे,यांनी मेळाव्यास उपस्थित राहून संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी
श्रीमती.चेतना धारीया(ता.समन्वयक ), श्री.रविंद्र देवळेकर(विशेष शिक्षक) श्रीमती.विद्या बेंद्रे (विशेष शिक्षक)श्री.दत्तात्रय पदुमले(विशेष शिक्षक)आदी मान्यवर उपस्थित होते.