आष्टी प्रतिनिधी-आमदार म्हटल्यावर मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणून मोठ-मोठे प्रकल्प न आणता फक्त तीन लाखांचे गावा-गावात चार जणात एक काम देऊन त्या कामाचे उदघाटन सध्याचे विधानसभेचे आमदार करीत असून ते तीन लाख रूपये कामांच्या लायकीचे असल्याची टिका आष्टा ह.ना गटाचे भाजपा नेते बद्रीनाथ जगताप यांनी आमदार आजबे यांच्यावर केली आहे.

आष्टी तालुक्यातील वाळूंज येथे आज दि.८ रोजी २५.५० कोटी रूपयांच्या रस्ता विकास कामाचे उदघाटन विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी बद्रीनाथ जगताप बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,आष्टी विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तालुक्यात किंवा मतदार संघात एकही मोठा प्रकल्प किंवा मोठ्या प्रमाणावर निधी आणला नाही.सरकार पडण्याच्या वेळी मतदार संघाची दिशाभूल करून खोटे-नाटे करत 1 हजार 468 कोटी रूपयांचा निधी खुंटेफळ साठवण तलावासाठी आणत दंड थोपटले,पण हे दंड कोणावर थोपटावे हे त्यांना कळायला पाहिजे होते.थोपटलेले दंड हा मतदार संघ विसरणार नाही.या मतदार संघाचा कायापालट फक्त आ.सुरेश धस च करू शकतील असेही बद्रीनाथ जगताप यांनी सांगीतले