दिनांक आठ नोव्हेंबरप्र

प्रशांत मैड शिक्रापूर पुणे.

पाबळ तालुका शिरूर येथील एका घराच्या टेरेसवरून चक्क 200 कबुतरे चोरीला जाण्याची घटना घडली आहे. याबाबत आकाश मनोर जगताप पुरंदर पाबळ तालुका शिरूर यांनी शिक्रपुर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती अशी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या समस जगताप यांचे शेजारील घराच्या भिंतीवरून टेरेसवर प्रवेश केला. यानंतर टेरेसवर असलेल्या पिंजऱ्यांमधून  सुमारे दोनशे कबुतरे पोत्या मधून भरून चोरट्यांनी पोबारा केला. ही कबुतरे चोरण्यासाठी चोरट्यांनी चक्क स्विफ्ट डिझायर या चार चाकी वाहनाचा वापर केला आहे. कबुतरे चोरण्यासाठी चोरट्यांनी केलेले हे धाडस परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहे.