मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे विरोधकांना शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत आले आहे. सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरल्यानंतर मंत्री सत्तार यांनी घुमजाव केला आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबादमध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिला भगिणींबाबत अपशब्द वापरला नाही. जे लोक आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललोय. सुप्रिया सुळेंबाबत कोणताही शब्द बोललो नाही, पण तरिही त्यांच्या महिलालांची मनं दुखवली असेल तर मी खेद व्यक्त करतो, पण मी असं बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्यांबाबत बोललो ज्याच्या डोक्यात परिणाम आहे. पण जे वेगळा अर्थ काढू लागले. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिलांचा सन्मान करतायत, तसा मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे असं सत्तार म्हणाले.

याबाबत पत्रकारांनी आणखी प्रश्न विचारले असता सत्तार म्हणाले की, तुम्ही मला उचकवण्याचं काम करु नका, तुम्ही आमच्यात भांडणं लावू नका. आगीत तेल टाकण्याचं काम करु नका. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी महिलांचा आदर कारणारा कार्यकर्ता आहे.

मी अल्टिमेटमला घाबरत नाही

राष्ट्रवादीने दिलेल्या २४ तासांच्या अल्टिमेटमबाबत सत्तार म्हणाले की, कुणीही अल्टिमेटम वैगेरे देऊ नका मी अल्टिमेटमला घाबरत नाही. मी महिलांबत काहीही बोललो नाही. कुणीही माझ्या घराच्या काचा वैगेरे फोडू नका, मी कुणालाही घाबरत नाही असं सत्तार म्हणाले आहेत.