लोकगीतातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहचतायत गावोगावी
औसा प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यात ओ... मामा, ओ काका, ये मावशी तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना... शाहीर पाहडी आवाजात गाव एकत्र करतो.. अन पोवडा, गीतं, सवाल जबाबतून सामान्यातल्या सामान्य माणसाला सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचवतो, उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजतात.. सोमवारी रात्री पानगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जिल्ह्यातील कलापथकाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचे हे चित्र होतं...कार्यक्रमाला उपस्थिती होती विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची... सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात योजनांची माहिती ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अनुसूचित जाती उपयोजना 2022-23 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील बारा कलापथक व पथनाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 180 गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेंचे मोहिमेचे सोमवारी (दि. 27) पानगाव येथे उद्घाटन झाले. परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या धम्मपाल सावंत यांच्या चमूने याठिकाणी कलापथकाच्या कार्यक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात मंगळवार (दि. 28) पासून कलापथकांद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती होणार आहे. संस्थेचे नाव त्यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणाऱ्या गावांचा तपशील पुढीलप्रमाणे- *मुक्ताई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, लातूर-* लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, कातपूर, हरंगुळ, आर्वी, पाखर सावंगी, गंगापूर औसा तालुक्यातील आलमला, आशिव, बेलकुंड, भादा, बुधोडा, बिरवली, चिंचोली का., हासलगण. *मानव विकास अभियान, लातूर-* अहमदपूर तालुक्यातील हाडोळती, उजना, खंडाळी, सुनेगाव सांगवी, कोंडगाव, थाडेगाव, तळेगाव, चाकूर तालुक्यातील आटोळा, घरणी, लातूर रोड, महाळंग्रा, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, डिगोळ (देशमुख). *संजीवनी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, लातूर-* निलंगा तालुयातील मदनसुरी, दापका, हलगरा, अंबुलगा बु., हालसी (तू), होसूर, खडक उमरगा, जेवरी, तगरखेडा, औराद शहाजानी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कोळेगाव बु., चामरगा, येरोळ, शिवपूर. *जीवन समाजिक विकास प्रतिष्ठाण, मु. पो. डिगोळ ता. शिरुर अनंतपाळ-* जळकोट तालुक्यातील घोणसी, गुत्ती, तिरुका, अतनुर, रावणकोळा, मेवापूर, वांजरवाडा, धामणगाव, कुणकी, माळ हिप्परगा, होकर्णा, पाटोदा बु., उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर, मादलापूर. *साईकृपा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पानगाव ता. रेणापूर-* लातूर तालुक्यातील खंडापूर, रेणापूर तालुक्यातील मोटेगाव, गोढाळा, खलंग्री, कारेपूर, बिटरगाव, गरसुळी, खरोळा, कामखेडा, निवाडा, समसापूर, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा, हिप्पळगाव, हिसामाबाद. *स्वरसाधना भजनी मंडळ, लातूर-* लातूर तालुक्यातील अंकोली, बामणी, करकट्टा, चाटा, बाभळगाव, सारोळा, औसा तालुक्यातील मातोळा, नागरसोगा, शिवाणी बु., तुंगी बु., उटी बु., वांगजी, चिंचोली तपसे.ऋचा फाऊंडेशन, यशवंतवाडी ता. रेणापूर- निलंगा तालुक्यातील पानचिंचोली, गौर, मसलगा, निटूर, केळगाव, राठोडा, शेडोळ, शिरोळ, लांबोटा, कासार सिरशी, रामलिंग मुदगड, भूतमुगळी, उस्तुरी, चिंचोली (स.). गीतादेवी ग्रामीण विकास शिक्षण संस्था, लातूर-अहमदपूर तालुक्यातील सताळा, धानोरा, कोपरा, कुमठा बु., हिप्पळगाव, वायगाव, किनगाव, अंधोरी, चिखली, टाकळगाव, हिप्परगा (का), नांदुरा बु., तेलगाव, शिरूर ताजबंद. जय मल्हार सांस्कृतिक कला मंडळ, सोमनाथपूर ता. उदगीर- उदगीर तालुक्यातील अवलकोंडा, बनशेळकी, भाकसखेडा, दावणगाव, देवर्जन, डिग्रस, डोंगरशेळकी, गुडसूर, वाढवाना बु., हाळी, हंडरगुळी, किल्ली येल्लादेवी, हेर, करडखेल.सर्वधर्म समभाव कला मंडळ, खंडाळा, ता. लातूर-लातूर तालुक्यातील भोई समुद्रा, जवळा बु., तांदूळजा, गोंदेगाव, काटगाव, मुरुड, गातेगाव, साखरा, औसा तालुक्यातील हिप्परगा क, जावळी, कोरंगळा, किणीथोट, खरोसा, लामजना.परिवर्तन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, कोष्टगाव ता. रेणापूर- चाकूर तालुक्यातील अजनसोंडा बु., चापोली, झरी बु., देवंग्रा, सुगाव, नळेगाव, शिवणखेड, जानवळ, वडवळ, कबनसांगवी, रोहना, रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, भंडारवाडी, पानगाव.जनविकास संस्था मुरढव ता. रेणापूर- देवणी तालुक्यातील भोपणी, होनाळी, बोरोळ, धनेगाव, हेळंब, हिसामनगर, दवण हिप्परगा, जवळगा, कवठळा, देवणी खु., इंद्राळ, कोनाळी, सय्यदपूर, तळेगाव.