सावरगाव: सावरगाव जांब नदीच्या पुलावर अचानक दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नांदात कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ब्रेक मारताच हा दुचाकीस्वार बचावला. पण कंटेनरचा मागील भाग पूर्णपणे विरुद्ध दिशेने गेल्याने त्याची एका तरुणाच्या बाईकला धडक बसली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
सावरगाव जांब नदीपलीकडे मृत योगेशची शेती आहे. रविवारी नेहमीप्रमाणे योगेश हा आपल्या शेतात गेला होता. शेतातून परत येत असताना गळपुरा चौकाकडून सावरगाव रोडकडे एक कंटेनर येत होता. त्यावेळी एक दुचाकी चालक रस्त्याच्या मधोमध आला. त्याला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक दाबले. अचानक ब्रेक दाबल्याने कंटेरनरचा समोरील भाग विरुद्ध दिशेने सरकला. त्यामुळे कंटेनरचा मागील भाग हा योगेशच्या दिशेने आला.
कंटेरनच्या माघच्या भागाची योगेशच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कंटेनरचा समोरील भाग पुलाखाली गेला आणि योगेशची दुचाकी त्यात फसली. या अपघातात योगेशला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असताना योगेशचा मृत्यू झाला. या अपघातात कंटेनरचे चालक आणि वाहक दोन्हीही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.