चिपळूण शहर बाजारपेठेतील मारवाडी आळी येथील गायत्री ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने लांबविले आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
याबाबत विजयकुमार गंगाराम रतावा यांनी चिपळूण पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी रात्री ३:३० वाजण्याच्या सुमारास गायत्री ज्वेलर्सचे शटर उचकटून अज्ञाताने दुकानात प्रवेश केला व ३५ हजार रुपये किमतीची सव्वा किलो वजनाचे चांदीचे पैंजण चांदीचे करदोडे, वाळे, पंधरा हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाचे पैंजण, साडेतीन हजाराची दोन घड्याळे, वीस हजार रुपये रोख व अन्य साहित्य मिळून ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.