मिरज: मिरज शहरात मिशन हॉस्पिटल समोरुन ओमणी ही चारचाकी वाहन जात असताना वाहनातील वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन वाहनाने पेट घेतला. यात गाडी जळून खाक झाली आहे.
ओमणी वाहनमध्ये नाष्टा सेंटरचे साहित्य व दोन महिलांसह चालक बसला होता. वाहनातून धूर आणि आगीचे लोट बाहेर येताना रुग्णवाहिका चालक आणि रिक्षा चालकांनी पाहिले. यानंतर चालकाला बाहेर काढून आगीवर अग्निशमन साहित्याचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीच्या विळख्यात वाहन पूर्ण आल्याने आगीने रुद्र रुप धारण केले होते.
कारसह साहित्याचे नुकसान
अग्निशमन दलाच्या जवानांना यांची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी तात्काळ जवानांनी धाव घेउन आग आटोक्यात आणली. आगीत मात्र वाहन जळून खाक झाले आहे. नाष्टा सेंटर मालक ललिता करचे यांच्या मालकीचे वाहन असून यामध्ये गॅस नाष्टा तयार करण्याचे साहित्याचे नुकसान झाले आहे.