संभाजीनगर, इतिहासाची मोडतोड करणारा , खोटा इतिहास दाखवणारा " हर हर महादेव ' चित्रपट तत्काळ बंद करावा , अन्यथा संभाजी ब्रिगेड तो बंद पाडेल , असा इशारा प्रदेश प्रवक्ते डॉ . शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड . मनोज आखरे , महासचिव सौरभ खेडेकर व केंद्रीय कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक झाली . त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ . भानुसे यांनी कळवले आहे . या चित्रपटात शूरवीरांच्या कर्तृत्वावर खोडसाळपणा केला आहे . छत्रपती शिवरायांना रामदासी वेशात दाखवले आहे . कवड्यांची माळ घातली आहे . बाजीप्रभूंना शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदारांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे . कान्होजी जेधे खलिता घेऊन बाजीप्रभूंकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधेंना शिपाई करणे आहे . बांदल देशमुख खुळी , व्यभिचारी दाखवली आहे . यात अशा अनेक चुकीच्या गोष्टी आहेत . यासोबतच " वेडात मराठे वीर दौडले सात ' या चित्रपटाची स्क्रिप्ट संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये , असा इशारा देण्यात आला आहे