राज्यभरात होणाऱ्या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सुमारे २७५ जागा भरण्यासाठी आगामी काळात भरती प्रक्रिया सुरू होईल अशी आशा आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना पोलीस भरतीत सेवेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी जिल्हाभरात अनेक युवक तयारीला लागले आहेत.असे असले तरी केवळ अंग मेहनत गरजेची नसुन आरोग्य,शिक्षण सामान्यज्ञान आणि बुद्धिकौशल्य तितकेच महत्त्वाचे असते.मेहनती,इच्छुक आणि योग्य त्या उमेदवाराला संधी मिळाली ह्या स्तुत्य हेतुने रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गर्शनाखाली दिनांक 05/11/2022 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीवर्धन मार्फत म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलां- मुल़ीं करिता एक दिवसीय पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.कुणबी समाज सामाजिक सभागृह श्रीवर्धन येथे संपन्न शिबिरात दुसऱ्या सत्रात उपस्थीत शिबीरार्थिना म्हसळा पोलिस स.निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी भरती प्रक्रिया बाबत योग्य ते मार्गदर्शन करताना पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर लेखी परीक्षा आणि टाइम मॅनेजमेंट या बाबत अचुक मार्गदर्शन केले.आयोजीत शिबिरात दोन्ही तालुक्यांतील सुमारे 120 मुला मुलींनी पोलिस भरती प्रक्रिया बाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले.पोलिस प्रशासना मार्फत पोलिस भरतीत इच्छुक असलेल्या मुलांना प्रथमतः च भरती पुर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याने शिबिरार्थी युवक युतींनी रायगड पोलिस प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.