ई-श्रम कार्ड नोंदणीला गती द्यावी डॉ. खाडे यांनी यावेळी ई-श्रम कार्ड नोंदणीचा आढावा घेतला. ते म्हणाले ई-श्रम नोंदणी काळाची गरज असून प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्धरितीने पूर्ण करावी. नोंदणी वाढविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, असेही ते म्हणाले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचा आढावा घेतांना डॉ. खाडे यांनी अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरिक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच कामगारांच्या वैद्यकिय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी, असे सांगितले. प्रधान सचिव विनिता सिंघल म्हणाल्या की, कामगारांची नोंदणी वाढावी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. विटभट्टी कामगार, बांधकाम कामगार अशा असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची जागेवर नोंदणी करावी. कामागार कार्यालय आणि कामगार यांच्यात थेट संवाद असावा. मध्यस्थीला वाव देता कामा नये. प्रलंबित वैयक्तीत प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावीत, असेही त्या म्हणाल्या.  यावेळी औद्यागिक सुरक्षा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा, कामगारांची वैद्यकीय तपासणी, प्राणघातक अपघातांची मागणी, सानुग्रह अनुदान व नुकसान भरपाई आदींबाबत आढावा घेण्यात आला.