रत्नागिरी : संजीवनी कोचिंग सेंटर, रत्नागिरीचे डायरेक्टर डॉ.केदार कुंभार यांची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याने डॉ. केदार कुंभार यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एक शिक्षक आणि तब्बल तीस विषय ही संकल्पनाच विचारापलिकडे आहे. पण डॉ.केदार कुंभार यांनी हे करून दाखवले. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे NEET परीक्षा होय.वैद्यकीय अभ्यासक्रमातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांचे सखोल अध्यापन सर एकटेच करतात.तसेच स्पर्धा परीक्षा, GS, CSAT , वेदिक गणित आणि असे तब्बल ३० विषय केदार सर शिकवू शकतात. सतत वैविध्यपूर्ण वाचन हेच या मागचे गुपित असल्याचे केदार सर सांगतात.
केदार कुंभार यांचे संबंधित विषयातील ज्ञान पाहून शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज, विदयार्थी, पालक वर्ग आश्चर्यचकित होतात. अत्यंत प्रगाढ बुध्दीमत्ता, प्रत्येक विषयातलं अद्ययावत ज्ञान पण तरीही तितकाच साधेपणा ही केदार कुंभार यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार स्वीकारलेले केदार सर आजही तेवढ्याच तळमळीने विद्यार्थांत रुळताना दिसतात. केदार सर आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यातील गुरू - शिष्याचे नाते हे नेहमीच दृढ राहिलेले आहे.
सरांचे मार्गदर्शन घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. डॉ.केदार सर व सर्वोच्च गुणसंपन्न विद्यार्थी हे जणू समीकरणच तयार झालेले दिसते.
डॉ.केदार सर यांच्या प्रगाढ बुध्दीमत्तेची दखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल डॉ.केदार कुंभार यांना अनेक मान्यवर, मित्र,विद्यार्थी - पालक परिवार, आप्तेष्ट, हितचिंतक यांच्यामार्फत सत्कार- शुभेच्छा देण्यात आल्या.