मेडशी

दिनांक 04 नोव्हेंबर 2022 वाशिम जिल्ह्यामधील मेडशी गाव येथील बागवान समाजातील प्रथमच सर्जन प्रशिक्षणासाठी मुंबई येथे निवड. सना आफरीने पहिल्याच प्रयत्नात नीट मध्ये उत्तम गुण घेऊन मुंबई येथील केईएम रुग्णालयामध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले .आता त्यांची निवड मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये झाली असून, मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे सर्वत्रिकडे कौतुक होत आहे.  आई डॉक्टर व वडील ही डॉक्टर निकहत शेख रफिक ,  व   वडील डॉक्टर शेख रफिक शेख चांद भाई यांची मुलगी असून, माजी पंचायत समिती सभापती शेख गणीभाई हाजी शेख चांदभाई, माजी उपसरपंच शेख रजाकभाई मेडशी गावचे सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांना यशाचे श्रेय दिले.