गुहागर : वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी नूतन जिल्हाध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांची भेट घेतली. यावेळी नूतन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

दरम्यान उत्तर जिल्हा मतदासंघांतील जनतेच्या विविध समस्यांबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जनतेच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मी लोकांसाठीच बसलेलो आहे. ज्या समस्या सोडविण्यासारख्या असतील त्या सर्व समस्या जिल्हास्तावरून सोडवल्या जातील. असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सतिशदादा व अन्य पदाधिकारी आदी उपस्थित होते.