काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली व मोठ्या प्रमाणात पक्षांतर आणि त्यानंतर सत्तांतर झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात तथा सध्याच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक आमदार, खासदार, व शिवसैनिक गेले परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटात तथा सध्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रेमी बहुसंख्य शिवसैनिक राहिले.
शहरातील बाळासाहेबाचे कडवट शिवसैनिक असलेल्या शिवसैनिकांना पद देऊन काम करण्यास संधी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दखल घेतली आणि धर्माबाद तालुक्यातील पदाधिका-यांची पद नियुक्ती व्हावी म्हणून पक्षप्रमुखाकडे यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात नाव नियुक्तांची प्रसिद्धी पत्र काढण्यात आले व बातमी प्रकाशित करण्यात आली व उपयुक्त पदी वरील चौघांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा उपजिल्हाप्रमुख पदी गणेश गिरी यांचीतर धर्माबाद तालुका प्रमुख पदी रामचंद्र रेड्डी येताळकर धर्माबाद तालुका संघटक पदी माजी पंचायत समिती सभापती मारोती कागेरु शहरप्रमुख पदी बालाजी बनसोडे शहर संघटक पदी राजू श्रीरामने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध माध्यमातून अभिनंदन केल्या जात आहे नायगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व पत्रकार बांधव व सर्व नेते मंडळी सर्व व्यापारी , शिवसैनिकांचे निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत व सत्कार करून दूरध्वनी वरुण शुभेच्छा वर्षाव होत आहे.