पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथे संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत नेरुळ संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. यंदाच्या चालू हंगामातील ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. हनुमानपाडा येथील मैदानावर चार दिवसीय 32 संघामध्ये हे सामने पार पडले. रायगड, ठाणे जिल्ह्यातून अनेक संघानी सहभाग घेतला होता.

    या क्रिकेट स्पर्धेत 40+ व पेण तालुक्यासह उरण, पनवेल, खालापूर, कर्जत, कल्याण, नेरूळ-मुंबई येथील संघाने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये रणजी क्रिकेटपटू योगेश पवार, रायगडचा टायगर विश्वास पाटील, सोन्या गायकवाड असे नामांकित क्रिकेटपटू खेळण्यासाठी आले होते.

      या क्रिकेट सामन्यामध्ये पंच म्हणून नामांकित जय पवार-कल्याण, मुन्ना पठाण-शहापूर यांनी भूमिका पार पाडली. या सामन्यांचे समालोचन अक्षय प्रभावती जनार्दन पाटील-रावे यांनी केले. त्यांना D J ऑपरेटर आशिष पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

  या स्पर्धेदरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून गोपीनाथशेठ मोकल, सुदर्शन पाटील, जेष्ठ पत्रकार विजय मोकल, विनायक पाटील,प्रकाश माळी, रूपेश गोडीवले , संजय डंगर, सुधाकर म्हात्रे, नरेश, सुभाष शिंदे, रवी पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल, जेके पाटील, निकेश पाटील, रोशन पाटील, सुनील म्हात्रे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

  या स्पर्धेत प्रथम क्रमांक वन सोल्युशन नेरूळ, द्वितीय क्रमांक भेंडखल उरण, तृतीय क्रमांक R V चिंचपाडा पेण, चतुर्थ क्रमांक चिरनेर या संघानी पटकावला.त्यांना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज योगेश पवार पेण, उत्कृष्ट फलंदाज जुगल घरत भेंडखल, उत्कृष्ट गोलंदाज अजय ठाकूर नेरूळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनोज कदम नेरूळ यांची निवड करण्यात आली. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

  या स्पर्धेचे आयोजन नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडा व 40+ पेण तालुका अध्यक्ष सतीश पाटील त्यांच्यासह प्रथमेश पाटील, अनिकेत पाटील, सागर पाटील, विवेक पाटील, रोहन पाटील, कुणाल पाटील व ग्रामस्थनी खूप मेहनत घेऊन यशस्वीरित्या सामने पार पाडले.