तालुका प्रतिनिधी जिंतूर

जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील कर्तव्यदक्ष सरपंच गजानन वऱ्हाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जयसिंगपूर कोल्हापूर येथे महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2022 वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्रीमत भूषणसिंहराजे होळकरकर महाराजांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील माने माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव इत्यादी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.