मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक नवीन समीकरणं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
येत्या 20 किंवा 21 नोव्हेंबरला दोन्ही नेते एकत्र येऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत स्पष्टता जाहीर करण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात नवीन युतीचा प्रयोग पाहायला मिळणार का याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नव्हती. मात्र आता याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.