हिंगोली येथे नांदेड येथून ३०० भाविक भक्त नांदेड अमृतसर रेल्वेने घुमानला जात असताना हिंगोली रेल्वे स्थानकावर दोन नोव्हेंबर रोजी भव्य स्वागत करण्यात आले.या यात्रेच आयोजन नांदेड येथील नानक साई फाउंडेशन करत असते. पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील समता बंधुभाव टिकून राहावा या उद्देशाने यात्रा काढण्यात येत असते. संत नामदेव महाराज यांची जन्मभूमी नरसी नामदेव असल्याने. या यात्रेचा हिंगोलीत स्वागत करण्यात आला आहे.यावेळी डॉ. प्राध्यापक कुमार भालेराव, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ.वंदना काबरा, गणेश साहू,जयप्रकाश चव्हाण,सुदाम घ्यार,आलोक नारायण,समाधान खंदारे,नागरे,कवी शिवाजीराव कऱ्हाळे यांच्यासह नांदेड येथील नानक साई फाउंडेशनचे चेअरमन बोकारे,पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर,यांच्यासह हिंगोलीतील प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते.