भरघाव वेगाने जाणाऱ्या बसने पादचाऱ्यास चिरडले...

चितेगाव येथील एकाचा जागीच मृत्यू..

बिडकिन प्रतिनिधी:- 

दि.०१ रोजी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील चितेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरुन भरघाव वेगाने जाणाऱ्या बसने रोडवरुन चालणार्या पादचाऱ्यास उडवुन दिल्याने पादचारी जागीच ठार झाला आहे.पैठण औद्योगिक वसाहती मधील खाजगी कंपनीची बस प्रवासी सोडुन पैठण कडुन औरंगाबाद च्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून यात राहुल कल्याण त्रिभुवन,वय.२८ वर्षे,रा.चितेगाव,ता.पैठण हा व्यक्ती जागीच ठार झाला आहे.घटनास्थळी बिडकिन पोलिसांनी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील त्रिभुवन यास ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ संजय गोरे यांनी तपासुन मयत घोषित केले आहे.डॉ‌.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले आहे.

पैठण ते औरंगाबाद रोडवरील अपघाताची संख्या वाढत चालली असल्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.सदरिल घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप साळवे हे करित आहेत.चितेगाव येथील त्रिभुवन कुटुंबीयांवर हि काही दिवस उलटले असताना दुसरी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे...

रविंद्र गायकवाड, बिडकिन