शासनच्या वतीने दोषसिध्दिचे प्रमाण वाढविणे करीता वारंवार शासन परिपत्रके / मरर्गदर्शक सुचना प्राप्त होतात . त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक , श्री बच्चन सिंह यांनी आपले अधिनस्त सर्वे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सुचना व मार्गदर्शन करुन शासनाचे परिपत्रकाचे कटाक्षाने अनूपालन होणे करीता जिल्हयाचे ठिकाणी स्थापीत TMC सेल वाशिमचे मार्फतिने सर्वोतोपरी पर्यत्न सुरु ठेवले आहेत . त्यामुळे वाशिम जिल्हयातील सर्व पो.स्टे . च्या वतीने न्यायप्रविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक गंभिर व किरकोळ प्रकरणाचा जातीने पाठपुरावा करण्यात येत आहे . दिनांक 13.08.2022 रोजी शासनाच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते . त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयातील सर्व पो.स्टे कडुन न्यायप्रविष्ठ करण्यात आलेल्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होणे करीता व त्या व्दारे वाशिम जिल्हयाचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होणे करीता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक गोरख भांमरे यांच्या सुचना व दिलेले लक्ष पुर्णत्वास नेणे करीता सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी , समन्स / वॉरंट अमंलदार व कोर्ट पैरवी अमंलदार यांनी तसेच TMC सेलचे अधिकारी / अमंलदार यांनी जातीने प्रयत्न करुन महत्वपुर्ण कामगिरी केल्याने वाशिम जिल्हयातुन एकुन 774 केसेस मध्ये दोषसिध्दी प्राप्त झाली आहे . यात म पोकॉ संगिता मडावी पो.स्टे वाशिम शहर ,मपोकॉ सुप्रिया डोंगरे पो.स्टे मंगरुळपिर, पोको विष्णु दिंडरकर, मपोकॉ निता महाजन पो.स्टे कारंजा शहर, पोकॉ सुनिल पवाने पो.स्टे कारंजा ग्रामीण यांची उल्लेखनिय कामगिरी राहिल्याने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नमुद अमंलदार यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानीत केले आहे . त्याच प्रमाणे दि .12.11.2022 रोजी होणारे राष्ट्रीय लोकअदालत अनुषंगाने श्री बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक गोरख भांमरे यांनी कोर्ट पैरवी यांची आढावा घेवून जास्तीत जास्त प्रलिंबत खटल्याचा न्यायनिवाडा हाणे तसेच जास्तीत जास्त समन्स व नोटीस तामील करणे बाबत सुचना दिल्या तसेच मार्गदर्शन करण्यात आले .