औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .