रत्नागिरी : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी तर्फे मिरजोळे एमआयडीसी ते भाट्ये बीचपर्यंत 'फिट इंडिया फ्रीडम रन ३.० चे आयोजन करण्यात आल होते. या रनमध्ये तटरक्षक दलाचे सोळा जवान सहभागी झाले. या रनचा उद्देश तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, त्यांतून उद्भवणारे व्याधी इत्यादींबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा होता. आरोग्याची स्थिती मजबूत करणे आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून फिटनेससाठी प्रयत्न करत राहणे यांसाठी जनतेला प्रोत्साहन देण्यासाठीचा फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम संपल्यावर कमांडिंग ऑफिसर डीआयजी शत्रूजित सिंग यांनी दिवसभर आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी आरोग्य, फिटनेस आणि मॉर्निंग वॉकचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं