दिलीप हातागळे

चिखली

दि.२९/

चिखली:- 

सध्या राज्यात अति पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर येणारा थंडीचा काळ देखील हा अधिक तीव्र असू शकतो तर अशावेळी निराधार लोकांना या थंडीपासून बचाव करण्याचा मानस ठेवत आणि त्यांचे आरोग्याची काळजी आतापासून जोपासण्याचे ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली शहर उपाध्यक्ष सदानंद मोरगंजे यांनी जाणीव ठेवून आपल्या वाढदिवशी विनाकारांचे खर्च न करता तालुक्यातील भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी मोफत ब्लॅंकेटचे वाटप करून माणुसकीच्या प्रती एक उदार भावणा व्यक्त व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे ध्येय प्रत्येकाने केले जोपासले पाहिजे असे उदाहरण नक्कीच दिले आहे.थंडी पासून बचावासाठी त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे त्यांचे संस्थेकडून सुद्धा अभिनंदन करण्यात आहे

सविस्तर असे की, तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाच्या वतीने सोशल मिडियाच्या माध्यमातुन मोफत सेवा व मदतीचे आवाहन केले असता त्या आवाहनाची दखल घेत सदानंद मोरगंजे मित्रमंडळाच्या वतीने तुकाराम आश्रय वृध्दाश्रम येथे ब्लॅंकेट व ईतर भेट वस्तु देऊन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदिप पचेरवाल, सत्कार मुर्ती सदानंद मोरगंजे, प्रमुख उपस्थीतीत ईफ्तेखार जमादार विदर्भ अध्यक्ष कामगार सेना, दामोधर टेकाळे विधानसभा मुख्य सचिव राष्टवादी, प्रमोद चिंचोले शहर उपाध्यक्ष राष्टवादी, सुमेध जाधव, हरीभाऊ सपकाळ, नितीन खुनारे हे होते.

यावेळी मान्यवरांचे समोयोचीत मार्गदर्शन झाले तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रमास लागेल त्या मदतीसाठी सदानंद मोरगंजे मित्रमंडळ सदैव तत्पर राहील असे मत प्रदिप पचेरवाल यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांतभैया डोंगरदावे यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर डोंगरदिवे (पाटिल) यांनी केले. यावेळी, मनोहर डोंगरदिवे, शामराव डोंगरदिवे, रजणीकांत डोंगरदिवे, भास्कर डोंगरदिवे, आकाश डोंगरदिवे, महेंद्र डोंगरदिवे, सुधिर डोंगरदिवे, सुहास वानखडे, नितीन डोंगरदिवे यांच्यासह वृध्दाश्रमातील वृध्द व गावातील महिला पुरुष यूवा मोठया संखेने उपस्थीत होते.

https://republicnewslive.com/?p=2775

संपादक - सुरेश तायडे