चिपळूण : गेले अनेक वर्षे कोकण रेल्वेकडे ज्या आम्ही मागण्या करतोय त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या आमच्या मागणीनुसार चिपळूण जंगक्षण रेल्वेस्टेशनला थांबतात.
काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत, प्रवाशांची व आमची मागणी आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या थांबत नाहीत त्या थांबविण्यात याव्यात. गाड्या थांबवून प्रवाशांची गैरसोय दूर झाली तर रेल्वे तोट्यामध्ये जाणार नाही. गेले अनेक वर्षाची चिपळूण दादर पॅशेनजर गाडी सुरु करावी, अशी आमची मागणी आहे. त्याकडे कोकण रेल्वे दुर्लक्ष करीत आहे. कोकण रेल्वे प्रवाशी भाडेवाड रेल्वेमध्ये प्रवाशांनी दिले जात असलेले जेवणाचे दर याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. प्रवाशांची संख्या वाढवायची असेल तर प्रवाशांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. चिपळूणच्या जंगक्षण रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या सर्व गाड्याना थांबा दिलात तर कोकण रेल्वे तोट्यामध्ये गेली आहे. ती आपण बाहेर काडू शकतो. असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे व ते पुढे म्हणाले की, कोकण रेल्वे तोट्यात येण्यास वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. कोरोनाचे कारण देणे हे चुकीचे आहे.