कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथे दि.25 रोजी दिपावलीच्या संध्याकाळी माणुसकीला काळीमा फासणारी ह्रदयद्रावक घटना घडली.एका अल्पवयीन मुकबधीर मतीमंद मुलीवर एका नराधमाने सायंकाळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला.कन्नड पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून संबंधित नराधम आरोपी मोरू नामु राठोड वय.21 रा.हिवरखेडा याच्या  मुसक्या आवळून गुन्हा दाखल केला आहे.या तपास प्रकरणी  पिंक पथकाचे उपनिरीक्षक भूषण सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश छत्रे,बीट जमादार भागीनाथ आहेर, महीला पोलीस आशा पाटील यांनी मेहनत घेतली.