वाशिम तालुक्यातील काटा प्राथमिक आरोग्य केंद्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी घेतलेला पुढाकार हा लाखमोलाचा आहे. संघटनांनी भाऊबीजेनिमित्त आशाताईंचा साडी-चोळी देऊन हृद्य सत्कार केला. ही जपलेली बांधिलकी भावुक करणारी आहे.असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे यांनी केले. 26 ऑक्टोबर रोजी माॅ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटलच्या श्री. श्री.सभागृहात आयोजित भाऊबीज कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.कोरे बोलत होते.लायन्स क्लबचे अध्यक्ष बॉबी गुलाटी,रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ.सुखविंदर ओबेराय,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, काटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय काळे,सक्षमच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सरोज बाहेती,इनरव्हील क्लबच्या संगीता देशमुख, डॉ.अर्चना मेहकरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. लायन्स क्लब, रेडक्रॉस सोसायटी, आर्ट ऑफ लिव्हिंग,सक्षम इनरव्हील क्लब आदी सामाजिक संस्थांनी काटा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या गावातील आशाताईंना साडी-चोळी यासोबतच भेटवस्तू,दिवाळी फराळ आणि पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. ज्योती वाघ (नागठाणा), कमल कांबळे (तांदळी), राधा मोहोळे (जांभरून परांडे),संगीता गुडधे (कोंडाळा झामरे), मीनाक्षी जगताप (धारकाटा),मंदा झामरे (गटप्रवर्तक), हर्ष खडसे (गटप्रवर्तक), वनिता लगड (जांभरुण भिते), कल्पना सुर्वे (काटा),सुशीला वाकुडकर (वाळकी), जयश्री बांगरे (सावरगाव बर्डे), कल्पना कव्हर,सविता कव्हर (तामसी), वंदना ठाकरे (सुरकंडी), बेबी काकडे (झाकलवाडी),श्रीमती सरकटे, श्रीमती डाखोरे,प्रतीक्षा भगत, जिजाबाई काळे,वैशाली बाभणे, सुशीला नानवटे,बेबी नवघरे, वंदना गायकवाड,तोमला मालस या आशाताईंचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काटा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी सर्व गावे क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनाला मदत म्हणून या सर्व सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत.सामाजिक कार्यकर्ते तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हरीश बाहेती यांनी या संस्थांची मोट बांधली. डॉ. बाहेती यांनी प्रास्ताविकातून क्षयरोगमुक्तीबाबत माहिती देत भाऊबीजेनिमित्त घट्ट ऋणानुबंधासाठी आशाताईंना भावनिक साद घातली. समाजसेवक अविनाश मारशेटवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त भविष्यात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.ज्योती वाघ आणि राधा मोहळे या आशाताईंनी हृद्य सत्काराला उत्तर दिले.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व काटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच आशाताईंची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हाईट स्पेसच्या '' इर्जिक '' नावाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं