कन्नड तालुक्यातील बरकतपुर फाटा ते गावापर्यंत या तीन किलमीटर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे . बरकतपुर फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे १ ९ ८८ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण झाले होते . त्यानंतर , तब्बल २५ वर्षे या रत्याकडे एकाही लोकप्रतिनिधींनी व रस्ते बांधकाम विभागानेही लक्ष दिले नाही . २०१३ मध्ये ८०० मीटर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण झाले होते , उर्वरित रस्त्यावरील सर्व खडीकरण उखडून जागो जागी खड्डे पडलेले आहेत . पायी चालतांनाही तोल सांभाळत चालावे लागते लागत आहे , आता सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्याला पांधीचे स्वरूप आले आहे , या रस्त्याने पुर्ण चिखल झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे . चिखमय रस्त्यामुळे अपघाताची भीती आहे