निमगाव म्हाळुंगी येथे दिवाळीचा 'एक दिवा सैनिकांसाठी'

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

           निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे सैनिकांच्या सन्मानार्थ 'एक दिवा सैनिकांसाठी' उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

           निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंदभाऊ एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सैनिकांच्या घरी जाऊन सैनिकांच्या घराला फुलांचे तोरण बांधत, घरापुढे आकर्षक रांगोळी काढून दिवे लावण्यात आले. तसेच सैनिकांच्या कुटुंबियांना मिठाई देऊन शुभेच्छा दिण्यात आल्या.यावेळी प्रत्येक सैनिकांच्या घरोघरी भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान अशा घोषणांचा नारा दुमदुमला. 

        यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच सविताताई करपे, उपसरपंच तनुजाताई विधाटे, माजी उपसरपंच कविता चौधरी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप करपे, अश्विनीताई लांडगे, माजी सैनिक दत्तात्रय घोलप, उदयोजक विजय करपे, राहुलशेठ करपे, विनायक करपे, एकनाथ लांडगे, किरण काळे, योगेश करपे, महेश गोसावी, वामन गव्हाणे, विजय तागड,एकनाथ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.