जिंतूर /प्रतिनिधी

जिंतूर : तालुक्याचे मुख्य ठिकाण जिंतूर शहर असून शहरात शिक्षण घेण्यासाठी अनेक मुली ग्रामीण भागातून येतात तसेच महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिंतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी शहरात बुधवारपासून दामिनी पथक नियुक्त केले आहे.

            महिला असो किंवा शाळकरी मुली यांना रोडरोमियोंचा त्रास होवू नये, तसेच जिंतूर शहरात कोणत्याही महिलेवर किंवा मुलीवर अत्याचार होवू नये, तसेच गुन्हेगारीला आळा बसावा या करीता या पथकाची स्थापना करण्यात आली असून ज्या महिला, भगिनी, युवतींना रोडरोमिओंचा त्रास होत असेल त्यांनी त्वरीत या पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून अश्या समाजविघातक इसमांचा पोलिसांना बंदोबस्त करणे सोयीस्कर होईल. त्यासाठी दक्ष नागरीकांनीही दामिनी पथकास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिंतूर पोलिस प्रसाशनाद्वारे करण्यात आले आहे.

            पोलीस स्टेशन जिंतूर येथील दामिनी पथकात खालील प्रमाणे अधिकारी व अंमलदार यांना नेमण्यात आले. दरम्यान, नागरीकांनी मपोउपनि.निता कदम

मो.नं.9922660412, पोउपनि. कोरके मो.नं.7219002018, पोउपनि.सुलोचना गाडेकर मो. 7507666345, मपोहवा. लिला जोगदंड मो.नं.98233149992, पोशि. 873 सोहेल मो.नं. 8888776561, मपोशि.1677 थडवे मो.नं.7507546777 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिंतूर पोलिस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.