औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पोहचले असता . यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली . तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली . तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली आहे . तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले . उपमुख्यमंत्री म्हणाले की पाऊस किती पडावा महापलिका ठरवत नाही .. अस्मानी संकट आपल्या हातात नसतात . पण घोषणाची अतिवृष्टी सुरु आहे . भावनांचा दुष्काळ या सरकारमध्ये आहे . हे ऊत्सव मग्न सरकार आहे . उत्सव साजरे करा पण आपली प्रजा ही सुखी , समाधानी आहे का ? हे देखील पहिले पाहिजे . हे सरकार बेदकरपने सांगत की , ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही . त्यामुळे आता मंत्र्यांना चिखलात बुडवलं पाहिजे का ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला तर माझा हा दौरा प्रतिकात्मक केला आहे . शिधा वाटपात घोटाळा झाला की , नाही हे पुढे समोर येईल . मी जे म्हणतोय ते शेतकऱ्यांची मागणी आहे . दिवाळी साजरी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का ? ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर झाला पाहिजे होता . पण भावनांचा दुष्काळ आहे . हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे ही मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले