परळी (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी नगरपालिकेवर दिनांक 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफारश्या पठाण यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरातील मोहम्मदी या कॉलनी येथील रोड नाल्या करण्यात यावेत व पथदिवे उभारण्यात यावेत यासह परळी शहरातील नागसेन नगर भिमानगर येथील रोड नाल्या व लाईटची व्यवस्था करण्यात यावी.व दलितांच्या स्मशान भूमी मधील लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात याव्यात यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटूनही संबंधित नगरपालिकेचे कर्मचारी उडवा उडवी ची उत्तरे देतात व दिशाभूल करणारी कारणे सांगतात व तशा प्रकारचे लेखी ही दिले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी परळीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य मोर्चाच्या द्वारे जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात परळी तालुक्यातील व शहरातील वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकारी हीतचिंतक कार्यकर्ते इत्यादी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.