मातीच्या पणत्या नामशेष होण्याच्या मार्गावर".

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"दिवाळी पर्वात पणत्यांतून प्रकाश पेरणारा कुंभार अंधारातच"

पाचोड(विजय चिडे) दिवाळी दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जातो. जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो. यासाठी पणत्या लागतात. पारंपारिक पध्दतीने वापरात असलेल्या मातीच्या पणत्यांची आकर्षक दिसणान्या टेराकोटाने जागा घेतली. बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत्यावरुन दिसून येते. टेराकोटाच्या पणत्या दिसण्यास आकर्षक दिसून येत असल्याने कुंभारांनी बनविलेल्या पणत्या विक्रीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. यामुळे अनेक कुंभारांनी सुध्दा विविध ठिकाणाहून टेरा कोटाच्या पणत्या आणून त्याची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीच्या पर्वात पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने घर उजाळून टाकणारा ग्रामीण कलावंत कुंभार मात्र जगण्यासाठी आजही अंधारातच चाचपडत आहे. परप्रांतीय पणत्यांची क्रेझ वाढल्याने गावकुसात तयार झालेल्या पणत्यांना कुणी विचारेनासे झाले आहे. वर्षभर मेहनत करूनही उपेक्षिताचे जिणे त्यांच्या नशिबी येत आहे. दिवाळीचा उत्सव सगळीकडेच उत्साही वातावरणात सुरू झालेला आहे. ऐपतीनुसार खरेदी सुद्धा सुरू आहे. दिवाळीचा लख्ख प्रकाश तेवत ठेवण्याकरिता पणत्यांची घरोघरी गरज भासते. लक्ष्मी पूजेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा केली जाते. खरेदीची सगळीकडे लगबग असताना स्थानिक व्यापाऱ्याला व कारागिराला न विसरता आपल्याच मातीतून हस्तकलेच्या आधारे तयार झालेल्या पणत्या व मूर्ती खरेदी करा असे आवाहन आता केले जात आहे.

चौकट-दिवाळीच्या फराळाला यंदा महागाईचा तडका.

फराळाच्या किमतीत यंदा प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. चिवडा, लाडू, शेव, मोतीचूर, चकल्या आदी पदार्थाना बऱ्यापैकी मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ २० ते३० टक्केच व्यावसाय झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आज पासून आठवडाभर ग्राहक खरेदीसाठी गर्दी करेल असे बोले जात आहे.

फोटो काँप्शण-पाचोड ता.पैठण मध्ये दिवाळीसाठी पणत्याची विक्री करत आसनांता महिला.

(छाया-विजय चिडे,पाचोड.)