बिहार: लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले. बिहारमधील छपरा इथ मारुती मानस मंदिराच्या सचिवाचा अचानक मृत्यू झाला. मंदिराचे सचिव आणि प्राध्यापक रणजय सिंह मंचावर प्रवचन देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथच मंचावर कोसळले.

प्राध्यापक रणजय सिंह हे हनुमान जयंती सोहळ्याचे सचिव होते आणि ते शहरातील एक प्रसिद्ध व्यक्ती देखील होते. रणजय सिंह जेव्हा मंचावर प्रवचन देत होते. त्यावेळी ते पूर्णपणे निरोगी होते. पण, लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले. हे दृष्य पाहून तिथं उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला.

रणजय सिंह यांना रुग्णालयात नेल असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल. रणजय सिंह यांची मंचावर अचानक झालेल्या मृत्यूची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. मंचावर रणजय सिंह यांच्या आकस्मिक मृत्यू लोकांनाही मोठा धक्का बसला आहे.

रणजय सिंह भगवंताच स्मरण करत त्यांच्या चरणी पोहोचल्याचं अनेकांचं म्हणण आहे. असा मृत्यू फार कमी लोकांना मिळतो. प्राध्यापक रणजय सिंह यांच वय सुमारे 80 वर्षे होत. ते एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक-धार्मिक विषयाचे गाढे अभ्यासक होते.