रत्नागिरी : नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या द्वी साप्ताहिक रेल्वे गाडीच्या एका फेऱ्यांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातून कोकणात थेट रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर ते मडगाव दरम्यान 011 39 / 01149 अशी आठवड्यातून दोन दिवस विशेष रेल्वे गाडी चालवली जाते. कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार या गाडीच्या फेऱ्यांना दिनांक 2 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातून थेट कोकणात येणारी ही गाडी आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत १ जानेवारी 2023 पर्यंत धावणार आहे.

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 01139 / 01149 ही सुधारित वेळापत्रक तसेच थांब्यांसह धावणार आहे. यानुसार ही गाडी वरील कालावधीत नागपूर स्थानकावरून दर बुधवार तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगाव ला ती सायंकाळी 5:45 मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक 3 नोव्हेंबर 2022 ते एक जानेवारी 2023 या कालावधीत मडगाव जंक्शन वरून दर गुरुवार तसेच रविवारी रात्री आठ वाजता सुटून नागपूर लागली दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.

• नागपूर मडगाव विशेष गाडीचे थांबे

वर्धा, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमाळी.

एकूण 22 डब्यांची ही गाडी वातानुकूलित टू टायर, वातानुकूलित थ्री टायर, स्लीपर तसेच सेकंड सीटिंग अशा मिश्र आसन व्यवस्थेसह धावणार आहे.