गुहागर : आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तसेच भारिप बहुजन महासंघाचे वडाळा विधानसभा क्षेत्राचे माजी तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे संघटक, तसेच बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ८ गाव अजगोली या शाखेचे मुंबई माजी अध्यक्ष, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे. खंदे समर्थक, राजगृह व बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंबावर नितांत प्रेम असणारे निष्ठावंत शिलेदार, क्रीडाक्षेत्रात क्रिकेटपटू व फुटबॉलपटू म्हणून नावलौकिक मिळविलेले मौजे गाव अजगोली, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र अरविंद गणपत पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५७व्या वर्षी दुःखद निधन झाले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
दिवंगत अरविंद पवार हे धडाकेबाज व धडाडीचे कार्यकर्ता म्हणून सर्वज्ञात होते, चळवळीतील धगधगती आग म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या व्यक्तीमहत्व व कार्याच्या जोरावर त्यांनी नायगाव विधानसभा क्षेत्रात ठसा उमटला होता, ते मनमिळाऊ, सर्वसमावेशक स्वभावाचे होते, समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवंगत अरविंद पवार यांच्या अंत्ययात्रेला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर जातीने हजर होते, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, भारिप, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती व समाजातील विविध स्तरातील मान्यवर कार्यकर्ते व जनसमुदाय मोठया संख्येने सहभागी झाले होते, त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.
दिवंगत अरविंद पवार यांचा पुण्यानुमोदन विधी व शोकसभा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता, बीडीडी चाळ १५-ए. नायगाव येथे शाखा क्र. १०७ चे अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे योजिले आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आदर्शास श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ८ गाव अजगोली या शाखेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.