चंपावती पानसंबळ यांनी केला स्वखर्चातून शाळेचा रस्ता
बीड/ शिरूर
औसरमल गौतम
शाळेत जाणाऱ्या मुलांना चिखलातून काढावी लागत होती वाट शिरूर कासार तालुक्यातील पाडळी या गावातील पाडळी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना रस्त्या अभावी गुडगाभर पाण्यातून शाळेपर्यंत जावे लागत होते रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते परंतु या रस्त्याच्या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नव्हते गावातील सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट यांनी याची माहिती शिरूर तालुक्याच्या नेत्या चंपावती (काकी) पानसबंळ यांना दिली त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्या स्वखर्चाने रस्ता बनवून दिला. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला गावकऱ्यांच्या वतीने चंपावती पानसंबळ यांचे आभार मानले.