मध्यप्रदेश मधील नर्मदा नदीमध्ये महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची बस कोसळून अपघात झाला, अपघाताबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून बचाव कार्य व्यवस्थित पार पडावे व जखमींना तात्काळ उपचार मिळावे यासाठी मध्य प्रदेश प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एस टी महामंडळाकडून मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दहा लाखाची मदत देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत
 
  
  
  
  
  