श्री मच्छिंद्रनाथ समाधी सोहळ्यानिमित्त, श्री नवनाथ ग्रंथ पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार येथे करण्यात आले,आहे तरी याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गेली 23 वर्षाची परंपरा कायम राखत, हरिभक्त परायण वैराग्य महामेरू गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या आशीर्वादाने, तसेच हरिभक्त परायण महंत स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने, सदर श्री नवनाथ ग्रंथ पारायण व किर्तन महोत्सव दिनांक 19 पासून सुरू झाला असून ,दिनांक 26 पर्यंत संपन्न होणार आहे. यामध्ये पहाटे काकडा भजन विष्णुसहस्रनाम गीता पाठ पारायण भावार्थरामायण हरिपाठ कीर्तन हरीजागर अशी विविध कार्यक्रम निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार येथील मारुती मंदिर येथे सुरू आहेत. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन निमगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.