संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील साहस निवासी विशेष गरजा असलेल्या शाळेतील मुलांनी दिवाळी निमित्ताने रंगीत पणत्या व आकाशकंदिल विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.राजवाडे संकुल येथे साहस शाळेत सध्या १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदानंद भागवत,अडॅ.पुनम चव्हाण व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक संतोष गुरव,सौ.निलम काळगुडे,अश्विनी गीते या मुलांना विविध कौशल्ये शिकवत आहेत.दिवाळीसाठी या दिव्यांग मुलांनी १५०० पणत्या व आकाशकंदिल बनवले आहेत.देवरुख वेल्हाळ काॅम्लेक्स येथे विक्री स्टाॅल लावलेला आहे.या मुलांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी नागरीकांनी या ठिकाणी खरेदी केल्यास या मुलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.कागदापासुन विविध प्रकारची फुलेही ही मुले तयार करत असतात.