बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुक्याच्यावतीने आज दि 20 /10 / 2022 रोजी सकाळी 12 :00 वाजता गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपरोक्त विषयी अनुसरून आपणास विनंती पुर्वक निवेदन सादर करण्यात येते की ग्रामपंचायत कर्मचायांना दिवाळी सना करीता सानुग्रह बोनस देण्यात यावे 

सदरील ग्रामपंचायतीकडे राहाणीमान भत्याची अंमलबजावणी होत नसल्यामूळे तशी बाकी असते त्या अनुसरून कमीत कमी 15000 / . ग्रामपंचायत कर्मचार्याना प्रती कर्मचारी यांना बोनस देण्यात यावे हि मा साहेबांना नम्र विनंती 

या निवेदनामध्ये मागण्या खालीलप्रमाणे

1 ) दिवाळी सणाकरीता सानुग्रह मिळणे बाबत

2 ) दिवाळी सणापुर्वी सर्व राहणीमान भत्ता देण्यात यावा

3) ग्रामपंचायत कर्मचार्याना विनाकारण त्रास देऊ नये

4 ) ग्रामपंचायतने 8. 33 % कर्मचार्याच्या GPF खात्यामध्ये जमा करावे अशा विविध मागण्याचे निवेदन देताना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष क्रॉ उद्धव शिंदे तालुका सचिव क्रॉ सखाराम पोहिकर क्रॉ बाबासाहेब राठोड क्रॉ दिलीप पवार क्रॉ शेख याशीन भाई व ग्रामपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थितीत होते.