पाटोदा (प्रतिनिधी) आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वतीने तहसीलदार व स्टेट बँक व्यवस्थापक यांना पाटोदा तालुक्यातील दासखेड महसूल मंडळा अंतर्गत असलेल्या गांधनवाडी आणि ढाळेवाडी येथील शेतकऱ्यांनी सन २०१९-२०,२०२०-२१ आणि २०२१-२०२२ मध्ये खरीप पीक कर्ज उचललेले आहे परंतु सन २०१९-२० मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन पेरणी खर्च सुद्धा निघालेला नाही तर २०२२ मध्ये कमी पावसामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले.आत्ता परतीच्या पावसामुळे गेले २ आठवडे प्रचंड पाऊस झाल्याने सोयाबीनचे पिक तसेच कापूस व तूर पूर्णपणे पाण्या खाली गेलेले आहे त्यामुळे सन २०-२१ आणि २१-२२ या वर्षी उचललेले खरीप पिकाचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात येऊन ३० ऑक्टोबर पूर्वी या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.

सन २०२०-२१ मध्ये देखील ७२ तासात ऑनलाईन तक्रार दिली नाही या निकषावरून शेतकऱ्यांना विमा भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे सन २०२१-२२ मध्ये कोणत्याही जाचक अटीं न घालता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले जाऊ नये, याबाबत विमा कंपनीला अवगत करावे, जेणेकरून या संबंधित गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी ही निवेदनात विनंती केली पाटोदा तहसिलला निवेदन देताना आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक सोमिनाथ कोल्हे,जेष्ठ नेते बावणे बप्पा,गर्जे बापु,सरपंच पद्माकर घुमरे,अंगद सांगळे,पोपट कोल्हे, गणेश शेवाळे,राहुल सोनवणे,दत्ता वाघमारे यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते