औरंगाबाद : शासकीय कामासाठी ठेकेदाराकडून माळेगाव - पिंप्री धरणाच्या पात्रातून कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचा अवैध उपसा केला जात असल्याचा प्रकार रविवारी सोयगाव तालुक्यात उघडकीस आला . या भागातील शेतकऱ्यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली . तालुक्यातील निंबायती फाटा ते निंबायती गाव या चार किमी रस्त्यावरील खडीची दबाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम दिले आहे . या कामासाठी रविवारी अवैध गौण खनिजाचा सर्रास उपसा केला जात होता . या ठेकेदारांच्या कामाच्या अंदाजपत्रकातून हा दंड वसूल करण्यात यावा . महसूलच्या पथकांनी या ठिकाणी पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे