औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे . सोमवारी ( १७ ऑक्टोबर ) सिल्लोड , गेवराई व नांदेड येथे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले . यात दोन महिलांचा समावेश आहे . कर्जाचे ओझे वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील मोढा ( खुर्द ) येथील अल्पभूधारक शेतकरी बापूसाहेब महादू धांडे ( ३ ९ ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली . गावालगतच्या वस्तीवर स्वतःच्या शेतात गट क्रमांक १०५/१ येथे घर करून राहत होते . त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेसह विविध कार्यकारी सोसायटी , बचत गट आदी बँकांचे कर्ज झाले होते . सततच्या नापिकीमुळे त्यांना हे कर्ज फेडता येऊ शकले नाही म्हणून ते नैराश्यात होते . दुसऱ्या घटनेत नापिकीमुळे सुमनबाई पुंडलिक कोरेबोईनवाड ( ४५ ) या शेतमजूर महिलेने आत्महत्या केली . ही घटना उमरी तालुक्यातील मौजे गोरठा येथे रविवारी सकाळी घडली गेवराई तालुक्यात महिलेने झाडाला घेतला गळफास अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेवराई तालुक्यातील कांबी मंझरा गावात अल्पभूधारक कविता बळीराम मुळे ( ४२ ) यांनी झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना रविवारी सायंकाळी घडली . तलवाडा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर व बीट अंमलदार कुव्हारे यांनी काबी मांजरा येथे जाऊन पाहणी केली