रत्नागिरी : पावस येथील अनसुया आनंदी वृद्धाश्रमाला रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सामाजिक भान जपत शिधा वाटप केले. एक महिना कालावधीचे लागणारे धान्य येथील वृद्धाश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सदस्य अविनाश काळे, अनंत आगाशे, शेखर लेले, ल. वि. केळकर वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे, मोहन पटवर्धन यांच्यासमवेत आश्रमाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या आश्रमाची स्थापना कै. सौ. मंगला सोमणी यांनी केली होती. त्यांच्या पश्चात हा आश्रम चांगल्या स्वरूपात सुरू आहे. तसेच समाजातील दानशूर मंडळी येथे मदत करत आहेत.