औरंगाबाद :- १६ ऑक्टो. (दीपक परेराव)राष्ट्रीय महामार्ग ५२ पूर्ण होऊन या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, मात्र घाटातील रस्ता रुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांसह, प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे औट्रम घाटातील बोगदा त्वरित करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली १७ ऑक्टोबर, सोमवार रोजी दुपारी १:३० वाजता, अंधानेर फाटा या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या बरोबरच रास्ता पाणपोई चापानेर उड्डानपूल ते कारमाथा सर्व्हिस रोड करणे, तेलवाडी ते बोढरे औट्रम घाटापर्यंत संरक्षण कडे व रस्ता दुरुस्त करणे, करोडी टोल नाका ते औट्रम घाट रस्तावरील खड्डे दुरुस्त करणे यासह अंधानेर फाटा ते कन्नड, गल्ले बोरगाव ते देवगाव रंगारी, गल्ले बोरगाव ते टाकळी चापानेर, कन्नड ते वैजापूर राज्य महामार्ग ५२ या भुयारी मार्गाच्या आदी मागण्यासाठीही हा रास्ता रोको करण्यात येत आहे.

यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक,वाहनधारक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख संजय मोटे, ता. संघटक डॉ. अण्णा शिंदे, महिला आ. उपजिल्हा संघटक हर्षालीताई मुट्ठे, ता. संघटक रुपाली मोहिते, युवासेना ता. अधिकारी योगेश पवार, शहरप्रमुख सुनिल पवार, उपतालुका प्रमुख दिलीप मुठ्ठे, शिवाजी थेटे, संजय पिंपळे, विठ्ठल मनगटे, संजय राजपूत, गोकुळ डहाके, राजु बेला राठोड, विभागप्रमुख दिपक बोडखे, शरद शिरसाठ, काकासाहेब काळे, युवराज चव्हाण, विश्वास मनगटे, विलास पवार, अनिल चव्हाण सोपान नवले,अशोक दाबके, बाबासाहेब मोहिते, गिताराम पवार, डॉ. सदाशिव पाटील यांनी केले आहे.