औरंगाबाद : पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करुन तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा व कृषी विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले याच्या सह सिंचन व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी उर्वरित तालुक्यातील गावनिहाय नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश महसूल विभागाला कृषिमंत्र्यांनी दिले. तसेच फर्दापूर गावातील तसेच वाड्या वस्तीतील पाणीपुरवठा सूरळीत होण्यासाठी जल जीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न करावेत. तसेच पाणी पुरवठ्यासाठी लागणारी वीज जोडणी तसेच वॉटर ग्रीडच्या कामाच्या निविदा लवकर पूर्ण कराव्यात. खेळणा पाणी प्रकल्पाचे काम, निझामकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती आणि झकास पुष्प पठार विकासासाठी जिल्हा नियोजन विकास निधीत तरतूद करण्याचे निर्देश देखील यावेळी कृषिमंत्र्यांनी संबधित विभागाला दिले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જસદણ તાલુકાના દોલતપર પ્રાથમિક અને માધ્યમિક શાળામા ગણિત વિજ્ઞાનનું પ્રદર્શન યોજવામાં આવ્યું
જસદણ તાલુકાના દોલતપર પ્રાથમિક અને માધ્યમિક શાળામા ગણિત વિજ્ઞાન પ્રદર્શન યોજવામાં આવ્યું જસદણ...
श्रीरामाच्या जय घोषाने कन्नड शहर दुमदुमले
कन्नड: दि. १८ एप्रिल.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कन्नड शहरात रामनवमी उत्साहाने साजरी करण्यात...
NU Hospitals Launches Advanced Quaternary Nephrology & Urology Centre on Mission Road, Bengaluru
Bengaluru, April 23rd, 2026: NU Hospitals has announced the launch of its new quaternary
care...
লোকপ্ৰিয় গোপীনাথ বৰদলৈ দেৱৰ মৃত্যু তিথিক লোক কল্যাণ দিৱস হিচাপে উদযাপন
মঙলদৈ জিলা প্ৰশাসনৰ উদ্যোগত লোক কল্যাণ দিৱস উদযাপন ৷লোকপ্ৰিয় গোপীনাথ বৰদলৈ দেৱৰ মৃত্যু তিথিক লোক...