कॉलेज विद्यार्थांचा अपघातात मृत्यू तर दोन विद्यार्थी जखमी

सोलापुर :- परीक्षा देऊन मोटरसायकलवर घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकचा अपघात होऊन ठार झाला आहे तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ते निम्बर्गी या रोडवर घडली. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी सायन्स वर्गात शिकणारे तीन काँलेज विद्यार्थी कॉलेजमधून परीक्षा देऊन मोटारसायकलवरुन भंडारकवठे या आपल्या मुळगावी निघाले होते. मंद्रुप निंबर्गी रस्त्यावर काळे वस्तीजवळ ऊसाने भरुन निघालेल्या ट्रँक्टर आणि मोटारसायकल यात झालेल्या अपघातात आदर्श सिध्दाराम बिराजदार याच्या मृत्यू झाला आहे तर कृषीराज महादेव धनुरे आणि सचिन सोमनिंग चाबुकस्वार हे दोघे जखमी झाले आहेत.